गुजरात निवडणुकीपूर्वी आतंकवादविरोधी पथकाकडून १०० हून अधिक ठिकाणी छापे !

७१ कोटी ८८ लाख रुपये जप्त, तर ६५ जणांना अटक

कर्णावती (गुजरात) – राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात आतंकवादविरोधी पथकाने सुरत, कर्णावती, जामनगर, भरूच, भावनगर आदींसह १३ जिल्ह्यांतील १०० हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या. या वेळी ७१ कोटी ८८ लाख रुपये जप्त करण्यात आले, तर यात एकूण ६५ जणांना अटक करण्यात आली. पथकाने ११ नोव्हेंबरच्या रात्रीपासून धाडसत्र चालू केले. या कारवाईत काही संशयास्पद कागदपत्रेही सापडली आहेत. या कारवाईत आंतरराष्ट्रीय मार्गाने होणार्‍या करचोरी, तसेच पैशांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी १ डिसेंबरला आणि उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे.

संपादकीय भूमिका

भारतात निवडणुकांच्या वेळी अशा प्रकारे कोट्यवधी रुपये मिळतात, यात आश्‍चर्य काहीच नाही ! अर्थात् ही स्थिती लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. यावर हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !