ब्रिटनमधील हिंदू अधिक समंजस आणि चांगले वर्तन असलेले !

  • ब्रिटमधील ‘द टाइम्स न्यूज’ या वृत्तपत्राच्या अहवालातील माहिती

  • कारागृहातील कैद्यांपैकी केवळ ०.४ टक्के कैदी हे हिंदू !

भारतीय वंशाचे आणि हिंदु असलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (उजवीकडे)

लंडन – भारतीय वंशाचे आणि हिंदु असलेले ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंच्या संदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार ब्रिटनचे हिंदु नागरिक हे अधिक समंजस आणि चांगले वर्तन असलेले आहेत. तेथील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांपैकी केवळ ०.४ टक्के, म्हणजे केवळ ३२९ कैदी हे हिंदु आहेत. हिंदू हे ख्रिस्त्यांपेक्षा अधिक चांगले आणि अधिक पैसा कमावतात, असा अहवाल ‘द टाइम्स न्यूज’ या वृत्तपत्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या अहवालात पुढे म्हटले आहे की,

१. इंग्लंड आणि वेल्स येथे आतापर्यंत ९ लाख ८३ सहस्र हिंदूंचे स्वत:चे घर आहे.

२. ब्रिटनमध्ये गेल्या ५०० वर्षांपासून हिंदू येत आहेत.

३. वर्ष १९४७ मध्ये भारताचे विभाजन झाल्यानंतर हिंदू मोठ्या प्रमाणात ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्या वेळी देशात श्रमिकांची संख्या अल्प असल्याने भारतातील हिंदूंना ब्रिटनमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते.

४. १९७० च्या दशकात दुसर्‍यांदा हिंदू मोठ्या प्रमाणात ब्रिटनमध्ये आले. पूर्व आफ्रिकेतील युगांडात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ईदी अमीन यांच्या कार्यकाळात आशियाई लोकांना देशातून हकलण्या आले होते. त्या वेळी ४ सहस्र ५०० हिंदू भारतात परतले, तर २ सहस्र ७०० हिंदूंनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला होता.

५. १९९० च्या दशकात जेव्हा ब्रिटनने विदेशी विद्यार्थ्यांच्या ‘इमिग्रेशन’ कायद्यांमध्ये सूट दिली, तेव्हाही हिंदू मोठ्या प्रमाणात ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते.

६. ब्रिटनमधील हिंदूंच्या एकूण लोकसंख्येपैकी ४७ टक्के हिंदू हे एकट्या लंडनमध्ये रहातात. लंडनच्या एकूण लोकसंख्येपैकी ही संख्या ५ टक्के इतकी आहे. ईस्ट मिडलँड्स, लीस्टर यांसारख्या शहरांच्या साधारणपणे १० टक्के हिंदू वास्तव्य करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारतातील हिंदूंना ‘असहिष्णु’, ‘मुसलमानविरोधी’ म्हणून हिणवणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?
  • हिंदू कुठेही गेले, तरी ते तेथील समाजाशी समरस होतात, याचे ब्रिटनमधील ही आकडेवारी उदाहरण आहे. यामागे हिंदूंची ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ शिकवण कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !