साधकांनो, भ्रमणभाषवरील संपर्कांमुळे घरकाम, तसेच कार्यालयीन कामकाजात व्यत्यय येऊ नये, यासाठी सहसाधकांना आपल्या उपलब्ध वेळा सूचित करा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘प्रसारातील अनेक साधक कौटुंबिक दायित्व सांभाळून धर्मप्रसाराची सेवा करतात. ते घरी असतांना काही वेळा सहसाधक सेवेच्या संदर्भात त्यांना भ्रमणभाषवरून संपर्क करतात आणि सेवेविषयी बोलतात. त्यामुळे घरकाम आणि अन्य कामे करतांना साधकांना अडचण येते. याचा कुटुंबियांना त्रास होऊ शकतो, तसेच कार्यालयीन कामकाज आणि व्यवसाय करणार्‍या साधकांनाही अशा प्रकारची अडचण येते. हे टाळण्यासाठी प्रसारातील साधकांनी ‘कोणत्या वेळेत सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांनी आपल्याला भ्रमणभाषवर संपर्क करावा ?’, याच्या उपलब्ध वेळा त्यांना कळवाव्यात. आश्रमातील साधकांनीही ‘घरी रहाणार्‍या कुटुंबियांनी कोणत्या वेळेत संपर्क करावा ?’, हे त्यांना सूचित करावे.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१०.२०२२)