समान नागरी कायद्याच्या नावाखाली भाजपला हिंदुत्वाला पुढे न्यायचे आहे ! – ओवैसी

असदुद्दीन ओवैसी

कर्णावती (गुजरात) – भाजपला समान नागरी कायद्याच्या नावाखाली हिंदुत्वाला पुढे न्यायचे आहे. निवडणुकांच्या आधी अशा प्रकारची सूत्रे चर्चेला आणून भाजप मतपेटीचे राजकारण खेळत आहे, असा आरोप एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला. (समान नागरी कायद्याला विरोध करून ओवैसी त्यांच्या मतपेटीचे राजकारण करत आहेत ! – संपादक)

सौजन्य : TIMES NOW

संपादकीय भूमिका

  • सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा देशात समान नागरी कायदा करण्याचा सल्ला केंद्रशासनाला दिलेला आहे, हे स्वतः अधिवक्ते असणार्‍या ओवैसी यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? तरीही ते मुसलमानांची मते मिळवण्यासाठी अशा प्रकारची विधाने करून मुसलमानांचीच दिशाभूल करत आहेत, हे मुसलमान लक्षात घेतील का ?