भिवाडी (राजस्थान) येथे शिवमंदिरात ४ धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करत प्रसाद फेकला !

तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा प्रथम नकार; मात्र हिंदूंच्या आंदोलनानंतर दोघा आरोपींना केली अटक !

पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

भिवाडी (राजस्थान) – येथील हमीराका गावामधील शिवमंदिरात दलितांकडून प्रसादाचे वितरण चालू असतांना मुबारिक, मुफीद, तालिम आणि जोम खान या ४ मुसलमान तरुणांनी मंदिरावर आक्रमण केले. (दलित-मुसलमान भाई भाई म्हणणारे याविषयी कधीच बोलणार नाहीत ! – संपादक) त्यांनी तोडफोड करत सर्व प्रसाद फेकून दिला. या वेळी त्यांना रोखणार्‍या दलितांना त्यांच्याकडून मारहाण करण्यात आली. ही घटना २६ ऑक्टोबर या दिवशी घडली. या प्रकरणी दलितांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे दलितांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली.

दलितांकडून पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले जात असतांना तेथे काँग्रेसचे आमदार संदीप यादव पोचले. तेव्हा तेथे उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, ते आरोपींचा बचाव करण्यासाठी आले आहेत. त्यामुळे यादव आणि भाजप यांच्या समर्थकांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या वेळी पोलिसांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट होय ! येथे हिंदूंना न्याय मिळणार नाही, हे लक्षात घ्या !