२५.१०.२०२२ या दिवशी झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी आधी झालेल्या ग्रहणांच्या तुलनेत आध्यात्मिक त्रास न्यून जाणवणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘ग्रहणकाळात वातावरणातील वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे प्रतिवर्षी ग्रहणाच्या कालावधीत साधकांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतात. त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींची शक्ती अधिक वाढते आणि त्यांची मानसिक स्थिती बिघडते.

याउलट २५.१०.२०२२ या दिवशी झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी साधकांना आध्यात्मिक त्रास होण्याचे प्रमाण न्यून जाणवले. आश्रमातील साधक सेवा आणि नामजप करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत होते. त्यामुळे आश्रमातील साधकांचे तोंडवळे आनंदी जाणवले. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांचीही मनस्थिती चांगली होती. यावरून ग्रहणकाळात त्यांच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण अल्प प्रमाणात झाले, हे लक्षात येते. तसेच आश्रमात त्रासदायक शक्तीचा दाबही विशेष जाणवला नाही.

यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समष्टी कार्य करणार्‍या सनातनच्या साधकांची साधना गुरुकृपेने वाढत आहे आणि त्यामुळे ईश्वर त्यांचे रक्षण करत आहे’, असे लक्षात आले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०२२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.