पणजी – गोव्यातील हिंदूंवर इन्क्विझिशन (धर्मच्छळ) लादलेला फ्रान्सिस झेवियर याचे शालेय पाठ्यपुस्तकांमधून उदात्तीकरण चालू आहे. नुकत्याच झालेल्या शालेय परीक्षेत एका विद्यालयाच्या इयत्ता ६ वीच्या वर्गातील हिंदी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नामुळे ही गोष्ट पुन्हा समोर आली आहे.
या प्रश्नपत्रिकेत झेवियर याचे उदात्तीकरण करणारी माहिती असलेला एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्यावर आधारित ५ प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितली आहेत. या परिच्छेदात पुढील माहिती आहे –
‘जुने गोवे येथील बॉम जिझस चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मातील महान संत आणि प्रचारक सेंट झेवियर यांचे शव चांदीच्या पेटीत ठेवले आहे. प्रत्येक १० वर्षांनी भक्तगणांसाठी या शवाच्या दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या महान संताची आठवण म्हणून प्रतिवर्ष जुने गोवे येथे ३ डिसेंबर या दिवशी फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केले जाते आणि यामध्ये विविध साहित्यासमवेतच सेंट झेवियरला अर्पण करण्यासाठी मेणाचे हात-पाय विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि हे जत्रेचे खास आकर्षण आहे. जगभरातील लोक यामध्ये सहभागी होतात.’
या परिच्छेदावरून पुढील प्रश्न विचारण्यात आले आहेत.
१. जुने गोवे येथील फेस्ताचे खास आकर्षण काय आहे ?
२. सेंट झेवियरचे निधन कधी झाले ?
३. सेंट झेवियरचे शव किती वर्षांनी लोकांना दर्शनासाठी खुले केले जाते ?
४. परिच्छेदाला योग्य शीर्षक देणे
इयत्ता ४ थीच्या इंग्रजी विषयावरील पाठ्यपुस्तकातही फ्रान्सिस झेवियरचे अशाच प्रकारे उदात्तीकरण करण्यात आले आहे. या पाठ्यपुस्तकात ‘गोंयचो सायब’ या नावाने एक धडाच देण्यात आला आहे आणि यामध्ये झेवियरचे क्रॉस हातात घेतलेले एक चित्र अन् त्याची माहिती देण्यात आली आहे. ‘झेवियरने गोव्यात आल्यावर गोरगरिबांना साहाय्य केले आणि कारागृहात जाऊन बंदीवानांचे मतपरिर्वतन केले, तसेच तो निस्वार्थी जीवन जगला’, अशी माहिती देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|