पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या

पाकमधील पत्रकार अर्शद शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. याविषयी स्वतः त्यांची पत्नी जावेरिया सिद्दीकी यांनी ही माहिती दिली आहे. शरीफ यांच्या निधनाविषयी पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक होते. त्यांनी पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल बाजवा यांच्यावर अनेकदा टीका केली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते देश सोडून गेले होते, असेही म्हटले जाते.

भारतविरोधी होते अर्शद शरीफ !

केनियामध्ये हत्या करण्यात आलेले पाकचे पत्रकार अर्शद शरीफ भारतविरोधी होते. एका व्हिडिओमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांना शिवीगाळ करत ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या, तसेच ते हिंदुविरोधी होते. ‘देहलीतील दंगलीत मशिदी जाळण्यात आल्या आणि मुसलमान महिलांवर बलात्कार करण्यात आले’, असा आरोप ते करत होते.