कर्णावती महापालिकेने वसाहतीचे ‘अफजल खान नो टेकरो (टेकडी)’ नाव पालटून केले  ‘शिवाजी नो टेकरो (टेकडी)’ !

गुजरात उच्च न्यायालय

कर्णावती (गुजरात) – कर्णावती महानगरपालिकेने येथील एका वसाहतीचे ‘अफजल खान नो टेकरो (टेकडी)’ हे नाव पालटून ‘शिवाजी नो टेकरो (टेकडी)’ असे ठेवले होते. त्याला सुन्नी मुस्लिम वक्फ समितीने आक्षेप घेतला होता.

यावर गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणी झाल्यावर न्यायालयाने पालिकेला ‘मुसलमानांच्या आक्षेपावर विचार करावा’, असे सांगितले आहे.