हिंदु जनजागृती समिती आणि ‘वारसा परिवार अकलूज’ यांनी दिलेल्या निवेदनानंतर फटाके विक्रेत्यांना नोटीस !

पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

अकलूज (जिल्हा सोलापूर) – फटाक्यांवरील वेष्टनांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात. या चित्रांद्वारे हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखली जावी, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि ‘वारसा परिवार अकलूज’ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्वरित फटाके विक्रेत्यांना नोटीस बजावली. नोटीसमध्ये म्हटले आहे की, फटाके विक्रेत्यांनी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेले फटाके विक्रीस ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

निवेदन देण्याच्या वेळी सर्वश्री रणजीत गायकवाड, गणेश इंगळे, शिवाजी घोडके, रोहित सूर्यवंशी, रोहित खाडे, तेजस माने-देशमुख, आकाश वाईकर, सागर म्हेत्रे, सुरज सूर्यवंशी आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.