राजस्थानात २५० दलित कुटुंबांनी हिंदु धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला !

  • दुर्गादेवीची आरती केल्याने सवर्णांकडून मारहाण झाल्याचे प्रकरण

  • पोलीस, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करूनही आरोपींवर कारवाई न झाल्याने निर्णय !

बारां (राजस्थान) – येथील भुलोन गावात नवरात्रोत्सवात श्री दुर्गादेवाची आरती केल्यावरून २ दलित तरुणांना सवर्णांकडून मारहाण झाल्याने दुखालेल्या २५० दलित कुटुंबांनी हिंदु धर्मचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यांनी आक्रोश मोर्चा काढत त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा यांचे येथील बेथली नदीत विसर्जन केले.

या दलितांनी पोलीस, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यापर्यंत न्यायाची याचना केली होती; मात्र मारहाण करणार्‍या आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडल्यावर संबंधितांवर कारवाई होत नाही, याची नोंद काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेणार आहेत का ?