१. आध्यात्मिक त्रास होत असल्याने साधकाच्या मनात नकारात्मक विचार येणे
‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सनातनचे संत पू. मेनरायकाका यांची सेवा करतो. एक दिवस मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होते. त्यामुळे मला ‘त्यांच्या सेवेला जाऊ नये’, तसेच ‘नामजपादी उपायही करू नयेत’, असे वाटत होते. त्या वेळी माझ्या मनाची चिडचिड होऊन ‘घरी जावे’, असे वाटत होते; पण ही माझी पूर्वनियोजित सेवा असल्याने मला ती टाळता येणार नव्हती. त्यामुळे मी पू. मेनरायकाका यांच्या सेवेला गेलो.
२. पू. मेनरायकाकांनी सांगितलेल्या नामजपामुळे साधकाचा आध्यात्मिक त्रास न्यून होणे
मी पू. मेनरायकाकांकडे गेल्यावर त्यांनी मला ‘तू बरा आहेस का ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मला आज जास्त आध्यात्मिक त्रास होत आहे. ते मला म्हणाले, ‘‘तू इथे बसून नामजप कर. तू काही सेवा केली नाहीस, तरी चालेल.’’
२ अ. पू. मेनरायकाकांनी भिंतीवर मानस नामजप लिहून तो पुनःपुन्हा वाचण्यास सांगणे आणि यामुळे साधकाचा ५० टक्के आध्यात्मिक त्रास न्यून होणे : पू. काकांनी मला सांगितले, ‘‘तू भिंतीवर मानस नामजप लिही आणि तो परत परत वाच.’’ मी तसे करण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा पू. काका डोळे मिटून बसले होते. १० मिनिटांनी त्यांनी मला ‘आता त्रास न्यून झाला आहे का ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना ‘माझा त्रास ३० टक्के उणावला आहे’, असे सांगितले. त्यांनी मला नामजप तसाच चालू ठेवण्यास सांगितले आणि ते पुन्हा डोळे मिटून बसले. १० मिनिटांनी त्यांनी मला पुन्हा विचारले. तेव्हा माझा त्रास ५० टक्के न्यून झाला होता.
२ आ. पू. काकांनी साधकाला नामजप करत सेवा करण्यास सांगणे आणि त्यामुळे त्याचा त्रास पूर्णपणे न्यून होणे : त्यानंतर पू. काकांनी मला सांगितले, ‘‘तू आता सेवा करत नामजप कर.’’ त्याप्रमाणे मी नामजपासह पू. काकांची सेवा करू लागलो. २ घंटे अशी माझी सेवा झाली. तेव्हा माझा त्रास पूर्णपणे न्यून झाला होता.’
– श्री. अजित महांगडे, ढवळी, फोंडा, गोवा. (१५.८.२०२२)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |