ओडिशा येथे ५०० ख्रिस्त्यांचा पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश !

भाजपचे नेते प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांचे पाय धुतले

जमूरला (ओडिशा) – येथील १७३ कुटुंबियांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग करून पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. या कुटुंबांमध्ये सुमारे ५०० जणांचा समावेश आहे. हे सर्वजण अनुसूचित जाती आणि जमातीमधील आहेत. या वेळी विश्‍व कल्याण महायज्ञाचेही आयोजन करण्यात आले होते.

याचे आयोजन ‘धर्म जागरण समन्वय विभाग ओडिशा’ने आर्य समाज, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने केले होते. या वेळी भाजपचे नेते प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांचे पाय धुतले. ते म्हणाले की, या सर्वांना पुन्हा हिंदु धर्मात आणू नये; म्हणून समन्वयकांना धमक्या दिल्या जात होत्या.