आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पाठवणार्‍या सैनिकाच्या विरोधात गुन्हा नोंद

अमृतसर (पंजाब) – अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला माहिती दिल्याच्या प्रकरणी भारतीय सैन्याच्या एका सैनिकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस उपायुक्त परवेश चोप्रा यांनी सांगितले की, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी उत्तरप्रदेशातील उसराह रसूलपूर गावातील रहिवासी सैनिक मनोज चौधरी याच्याविषयी माहिती दिली होती. त्याच्या माहितीनुसार मनोज अमृतसरमध्ये तैनात असून तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हस्तक म्हणून काम करत होता. तो व्हॉट्सअ‍ॅप आणि सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमातून पाकिस्तानी तस्कर आणि गुप्तचर संस्था यांच्याशी जोडलेला होता. मनोज भारतीय सैन्याची माहिती आणि संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे, मानचित्रेेही पाकिस्तानी संस्थेला पुरवत होता.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !