राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ५ राज्यांतील ४० ठिकाणी धाडी

आतंकवादी, तस्कर आणि गुंड यांचा शोध !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाने (एन्.आय.ए.ने) पंजाब, हरियाणा, देहली,  बिहार आणि राजस्थान या राज्यांतील ४० ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी आतंकवादी, गुंड, अमली पदार्थांचे तस्कर, तसेच भारत आणि विदेशातील गुन्हेगारांचे जाळे नष्ट करण्यासाठी टाकण्यात आल्या.

एन्.आय.ए.च्या म्हणण्यानुसार या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही; मात्र ६ पिस्तुले, १ रिव्हॉल्व्हर, १ शॉटगन आणि दारूगोळा जप्त केला आहे. तसेच अमली पदार्थ, रोख रक्कम, गुन्ह्याची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बेनामी मालमत्तेची कागदपत्रे, धमकीची पत्रेही जप्त केली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवण्यासाठी परदेशातून पैसा आणला जात आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.