तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी खोटे वक्तव्य ट्विट करून गोळवलकर (गुरुजी) यांना केले अपकीर्त

तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (डावीकडे)

कोलकाता (बंगाल) – तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी खोटे वक्तव्य ट्विट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक पू. माधवराव गोळवलकर (गुरुजी) यांना अपकीर्त केले. ‘गोळवलकर इंग्रजांची गुलामगिरी करण्यास  सिद्ध होते; पण दलित, मागास आणि मुसलमान यांना समान अधिकार देणारे स्वातंत्र्य त्यांना नको होते’, हे खोटे वक्तव्य त्यांच्या नावाने आणि त्यांच्या छायाचित्रासह आझाद यांनी ट्विट करून केले आहे. (भगतसिंग, गोळवलकर गुरुजी यांसारख्या राष्ट्रपुरुषांना अपकीर्त करून राजकीय स्वार्थ साधणार्‍या  राजकारण्यांचा राष्ट्रप्रेमी जनतेने सनदशीर मार्गाने प्रतिकार करावा ! – संपादक)

१. एका ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटले आहे की, आझाद यांनी जे लिहिले आहे ते खरे नाही. त्यांनी गप्प बसावे.

२. सुशील अग्रवाल यांनी लिहिले आहे की, कीर्ती आझाद यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे, ते पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुजी यांनी नाकारले होते.

३. इतर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी आझाद यांनी केलेले हे विधान खोटे असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पू. गोळवलकर गुरुजी यांनी अशी कोणतीही टिप्पणी केली नव्हती, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

संघ आणि पू. गोळवलकर गुरुजी यांच्याविषयी काडीचेही ज्ञान नसतांना स्वतःचे अज्ञान पाजळणारे तृणमूल काँग्रेसचे नेते !