#Diwali : यमदीपदान करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?

यमदीपदानाच्या वेळी कणकेचा दिवा घराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून ठेवणे

१. यमदीपदान हे १३ संख्येमध्येच करण्यामागील कारणे

अ. ‘दिव्यांची संख्या १३ मानून त्यांची पूजा केली जाते; कारण या दिवशी बरोबर १३ पळे इतका कालावधी यमदेवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी नरकात वास्तव्यास असतात. याचे प्रतीक म्हणून १३ दिवे यमदेवतेला अर्पण केले जातात आणि त्याला आवाहन केले जाते, या विधीला ‘यमदीपदान’ असे म्हणतात.’

आ. ‘जिवाच्या देहात एकूण १३ प्रकारचे सूक्ष्म वायू असतात. त्यामुळे जिवाचा देह संचलित असतो. या १३ प्रकारच्या वायूंपैकी कोणताही वायू न्यून झाल्यास जिवाला रोग होणे, बेशुद्ध पडणे किंवा मृत्यू येणे या प्रकारचे त्रास सोसावे लागतात. १३ या संख्येच्या स्वरूपात दीपदान केल्यामुळे एकेका वायूवर असलेले मृत्यूचे आवरण नष्ट होऊन जिवाच्या शरिरात वाहत असलेले १३ वायू सुरळीतपणे कार्य करू लागतात. (१३ वायू म्हणजे पंचप्राण, पंचउपप्राण आणि उत्पत्ती, स्थिती अन् लय यांच्याशी संबंधित आहेत.)

इ. आपल्याला ठाऊक असलेले १० वायू (पंचप्राण आणि पंचउपप्राण) हे क्रियात्मक आणि प्रत्यक्ष संचारणात्मक वायू आहेत. याबरोबरच जिवाच्या प्रत्यक्ष कालवाचक संज्ञकतेशी, म्हणजेच कालचक्रातील सूक्ष्मदेहाच्या प्राणांच्या विविध स्थितीतील कालमय दर्शकजन्यात्मक स्वरूपकारकतेशी निगडित अप्रकट स्वरूपात प्रत्यक्ष कार्य करणारे तीन प्रमुख वायू असतात.

ई. हे तीन वायू प्रत्यक्ष उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांशी साधर्म्य साधून देहात क्रिया स्वरूपाचे कार्य करणार्‍या वायूंना जिवाच्या व्यष्टीचक्राच्या त्या त्या अवस्थेशी स्वतःच्या त्या त्या अवस्थेच्या प्रकटतेच्या त्या त्या स्वरूपाच्या कार्याशी एकरूपता प्रदत्त करून प्रत्यक्ष जिवाच्या सूक्ष्म आणि स्थूल स्वरूपाच्या देहात्मकतेचे पोषण करतात. या तीन वायूंचे कार्य प्रत्यक्ष निर्गुणात्मक स्वरूपजन्यात्मक क्रियावलयात्मकतेच्या स्वरूपाचे असल्यामुळे हे वायू अप्रकट स्वरूपाच्या कार्यस्वरूप ग्रहण होऊन कार्य करतात.

२. महत्त्व

अ. अपमृत्यूचा योग टाळता येणे

‘जिवाचा मृत्यूकाळ हा १३ दिवसांच्या कालचक्रांचा असतो. या १३ दिवसांच्या कालचक्रांत त्याच्यावर मृत्यूच्या काळ्या आवरणाचे प्रक्षेपण वाढून हळूहळू तो मृत्यूमुखी पडतो. त्यानंतरच्या १३ दिवसांत तो जीव भूलोकातून अन्य लोकात जाण्यासाठी कालाची एकेक सूक्ष्म-कक्षा भेदून जातो. याच कारणास्तव जिवाच्या मृत्यूनंतर १३ दिवसांपर्यंत श्राद्ध करण्याचे विधान आहे. अपमृत्यू येतांना तोही १३ कालचक्रांना ओलांडून येतो. या सूक्ष्म १३ कालचक्रांत असलेल्या अपमृत्यूचा योग टाळता यावा; म्हणून १३ दीपदान करून मृत्यूच्या पाशातून सुटका करून घेतली जाते.

आ. अकालमृत्यू टाळता येणे
‘यमलहरींच्या आकर्षणामुळे एखाद्या जिवाचे व्यष्टीचक्र कालरेषेवर असलेले त्याचे आकर्षण सोडून यमलहरींच्या प्रभावामुळे डावीकडे, म्हणजे यमलोकाचे आधिपत्य असलेल्या भागाकडे जाऊन काळपोकळीत पडते. यालाच ‘अकालमृत्यू’, असे म्हणतात. हा अकालमृत्यू टाळण्यासाठी यमलहरींना १३ दीपांचे दान करून शांत करण्यात येते.’

इ. ‘१३’ या अंकात यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य असणे
‘१३’ या अंकात यमाला तृप्त करण्याचे शब्दबीजात्मक स्वरूपाचे सामर्थ्य असल्यामुळे त्रयोदशीच्या दिवशी १३ दीपांच्या स्वरूपात मृत्यूच्या पाशातून सुटका करण्यासाठी यमाला प्रार्थना केली जाते.’ – श्री. निषाद देशमुख

सूक्ष्म-चित्र

यमदीपदानाविषयी प्रश्‍न आणि उत्तरे

प्रश्‍न : यमदीपदानासाठी १३ दिवे लावावेत, असे असतांना वरील चित्रात एकच दिवा दाखवला आहे. यामागचे कारण काय ?
उत्तर : १३ दिवे लावावेत, असे ग्रंथात स्पष्टपणे सांगितलेलेे नाही. तो आचार आहे. ग्रंथातील श्‍लोकांनुसार एकच दिवा लावायचा आहे.

प्रश्‍न : यमदीपदान करतांना संकल्प कसा करायचा, कोणत्या शब्दांत करायचा, तसेच तो संस्कृत भाषेत असल्यास पर्यायी म्हणून मराठी भाषेत करता येतो का ? पंचांग जवळ असणे किंवा कोणताही विधी करण्यासाठी पुरोहित मिळणे, या गोष्टी साध्य होतातच, असे नाही.
उत्तर : श्‍लोकाचा अर्थ लक्षात घेऊन यम देवतेला प्रार्थना करून दिवा ठेवला, तरी त्याचे फळ मिळते.

प्रश्‍न : यमदीपदान अमुक एका वेळेतच केले पाहिजे का ? काही कारणास्तव अन्य वेळी केल्यास चालते का ? उदा. सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत करणे जमले नाही, तर त्यानंतर केल्यास चालू शकते का ?
उत्तर : सूर्यास्तानंतर करणे म्हणजेच साधारणपणे सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत करणे. याला लाभाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नंतरचा काळ गौण भाग आहे. गौण भाग जरी असला, तरी त्या वेळेत यमदीपदान करू शकतो.

– सनातन साधक-पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझे

संदर्भ – https://www.sanatan.org/mr/a/687.html

#दिवाळी #diwali diwali दिवाळी #दिवाळी२०२२ #diwali2022 diwali2022 दिवाळी २०२२ #दीपावली #deepawali deepawali दीपावली #दीपावली२०२२ #deepawali2022 deepawali2022 दीपावली २०२२ #दीप #deep deep दीप #लक्ष्मीपूजन #lakshmipoojan #laxmipoojan lakshmipoojan laxmipoojan लक्ष्मीपूजन #आकाशकंदील #akashkandil akashkandil आकाशकंदील #नरकचतुर्दशी #narakchaturdashi narakchaturdashi नरकचतुर्दशी #पाडवा #padwa padwa पाडवा #भाऊबीज #bhaubeej bhaubeej भाऊबीज #भाईदूज #bhaidooj भाईदूज bhaidooj #भाईदूज२०२२ #bhaidooj2022 bhaidooj2022 भाईदूज२०२२ #भाऊबीज२०२२ #bhaubeej2022 भाऊबीज२०२२ bhaubeej2022