बायडेन यांनी इराणमध्ये अराजकता आणि दहशत निर्माण केली !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्यावरून इराणची टीका

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

तेहरान (इराण) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्यावरून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी टीका केली आहे. बायडेन यांनी या आंदोलनामध्ये अराजकता आणि दहशत निर्माण केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

१. जो बायडेन म्हणाले होते की, इराणमध्ये आंदोलन करणार्‍या लोकांनी दाखवलेले  धैर्य पाहून मी आश्‍चर्यचकित झालो आहे. अमेरिका इराणच्या शूर महिलांच्या पाठीशी उभी आहे. इराण सरकारने लोकांचे मूलभूत हक्क समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे रक्षण केले पाहिजे. सरकारने हिंसाचार थांबवला पाहिजे.

२. यावर उत्तर देतांना इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी म्हणाले की, दुसर्‍या देशात अराजकता, आतंकवाद आणि अशांतता भडकावणार्‍या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना याची आठवण करून दिली पाहिजे की, इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला ‘सैतान’ म्हटले होते.

३. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विधानावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, बायडेन यांनी दंगलींना पाठिंबा देऊन इराणच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला आहे.