व्यावहारिक जीवनातील निष्काम कर्मयोग भगवद्गीतेतून शिकलो ! – आशिष कुमार चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘मुंबई स्टॉक एक्स्चेंज’

आशिष कुमार चौहान

पुणे – प्रतिदिनच्या जगण्यात गीतेचे तत्त्वज्ञान उपयोगी पडते. गीता ही व्यवस्थापनाचा एक उत्तम ग्रंथ आहे. ज्यातून कसे जगावे ? आणि कसे काम करावे ? हे शिकता येते. फळाची अपेक्षा न करता, व्यावहारिक जीवनातील निष्काम कर्मयोग मी भगवद्गीतेतून शिकलो, अशी भावना ‘मुंबई स्टॉक एक्स्चेंज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केली. ते ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था’ येथे आयोजित केलेल्या ‘भगवद्गीतेतील व्यवहार चातुर्य’ या विषयावर बोलत होते.