रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

सकारात्मक आभा आणि स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व असलेला रामनाथी आश्रम !

अ. ‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि अप्रतिम आहे. येथील कार्यपद्धती चांगल्या आहेत. येथील साधक शिस्तप्रिय आणि सात्त्विक आहेत.

आ. येथे सर्वत्र सकारात्मक आभा दिसून येते. ‘येथे स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व आहे’, हे मला समजले.

इ. हा आश्रम पहाण्यासाठी अधिकाधिक लोकांनी यावे, जेणेकरून त्यांना एवढ्या सुंदर ठिकाणाची माहिती मिळेल.’

– पूजा मंगेशकर, गोवा.

सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

१. ‘पूर्वी माझा चांगली आणि वाईट शक्ती यांवर विश्वास नव्हता; परंतु हे प्रदर्शन पहातांना मी ते प्रत्यक्ष अनुभवले.’- श्री. मंजुनाथ बसवनगौडा (प्रदेशाध्यक्ष, बजरंग सेना), मंड्या, कर्नाटक.

२. ‘सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन अप्रतिम आहे. सध्याच्या काळाला याची आवश्यकता आहे. ‘सात्त्विक संगीताचा आपल्या सप्तचक्रांवर कसा परिणाम होतो’, यावर केलेले संशोधन अप्रतिम आहे.’ – श्री. तुलसीदास मंगेशकर, कांदोळी, गोवा.

३. ‘सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन बोधप्रद आहे. ते प्रदर्शन पाहून मला आध्यात्मिक दृष्टीकोन, वाईट शक्ती इत्यादींविषयी शिकायला मिळाले.’

– सौ. सुजाता शेणै, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (जून २०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक