संभाजीनगर विद्यापिठाच्या युवा महोत्सवाला प्रारंभ !

कुलगुरूंच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४ दिवसांच्या युवा महोत्सव २०२२ ला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला.

संभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४ दिवसांच्या युवा महोत्सव २०२२ ला १६ ऑक्टोबरपासून येथे प्रारंभ झाला. या वेळी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. गेली २ वर्षे कोरोनामुळे युवा महोत्सव झाला नसल्याने यंदा सर्वांमध्ये या महोत्सवाविषयी उत्सुकता होती. महोत्सवात चालू झालेल्या कलेच्या यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थी कलाकारांनी ‘तरुणाई म्हणजे केवळ मजा-मस्ती, हुल्लडबाजी हा आमचा स्वभाव नाही, तर सामाजिक जाणीव आणि कर्तव्य आम्हीही जाणतो’, हे देखाव्यातून मांडले. ‘व्यथा वेदनांचा लॉकडाऊन, महागाईने होरपळणार्‍या तरुणाईच्या व्यथा अन् शेतकरी राजाची दशा, राजकारणात हरवलेले सामाजिक भान याचे वास्तव’ देखाव्यांच्या माध्यमातून तरुणाईने सादर केले.