उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रेमींनी केली प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त बिहारमध्ये ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ !

बिहारमध्ये प्रतिज्ञेच्या वेळी जयघोष करतांना धर्मप्रेमी

पाटलीपुत्र (बिहार) – हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला द्विदशकपूर्ती झाली. या निमित्ताने भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे. या अंतर्गत बिहारमधील गया, पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, तसेच उत्तरप्रदेशमधील काशी, प्रयागराज, लक्ष्मणपुरी, अयोध्या आणि बाराबंकी या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा करण्यात आली. यात समितीच्या कार्यकर्त्यांसह अनेक धर्म आणि राष्ट्र प्रेमींनी सहभाग घेतला. गया येथील विष्णुपद मंदिरात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’साठी भगवान विष्णुच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.