बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना
बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली येथील प्रेमनगर भागातील बडा हनुमान मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. येथे जुबैर नावाच्या एका धर्मांध मुसलमानाने ११ ऑक्टोबर या दिवशी मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरल्याचे लक्षात आल्यावर मंदिरात उपस्थित हिंदूंनी त्याला पकडले. तेव्हा त्याने स्वत:चे नाव रोहित असे सांगितले; परंतु जेव्हा तो मुसलमान असल्याचे लोकांना समजले, तेव्हा त्याने हिंदु देवतांना अपशब्द उच्चारण्यास आरंभ केला आणि मंदिर बाँबने उडवण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Mohammad Zubair caught stealing from Hanuman Mandir in Bareilly, had identified himself as ‘Rohit’https://t.co/0QKs5oNbHd
— OpIndia.com (@OpIndia_com) October 12, 2022
जुबैर मंदिरात दानपेटीजवळ असल्याचे लक्षात आल्यावर पुजारी कुलदीप मिश्रा यांना संशय आला. मिश्रा यांना दानपेटी अस्ताव्यस्त झाल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी मंदिरात उपस्थित हिंदूंच्या साहाय्याने जुबैरला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ ओळखपत्र नसल्याचे त्याने सांगितलेे; परंतु त्याच्या दाढीवरून हिंदूंचा संशय बळावला. त्याच्या भ्रमणभाषवर संपर्क केल्यावर ‘ट्रू कॉलर’द्वारे त्याचे नाव जुबैर असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या खिशातून १ सहस्र ६९२ रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका
|