शहापूर तालुक्यात पांढरीच्या लाकडांची तस्करी करणार्‍यांवर वनविभागाची कारवाई !

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठाणे – जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये डोळखांब वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणार्‍या बांधनपाडा गावाशेजारील एका शेतघरावर वनविभागाने कारवाई केली आहे. येथून धार्मिक विधी, होम हवन आणि कोरीव काम करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पांढरीच्या लाकडांची तस्करी करण्यात येत होती. वनविभागाची कुठल्याही प्रकाराची अनुमती नसतांना अनिल देशमुख यांच्या मालकीच्या शेतघरावर आदिवासी मजुरांकडून कवडीमोलाने ही दुर्मिळ लाकडे गोळा केली जात होती. आदिवासींच्या अज्ञानाचा लाभ घेत हा व्यवसाय चालू होता. या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.