आई दीपाई (पू. दीपाली मतकर) प्रेमळ माऊली सर्वांची ।

पू. (कु.) दीपाली मतकर

आई दीपाई (टीप १) अमुची ।
प्रेमळ माऊली सर्वांची ।। १ ।।

श्री. दयानंद खरात

खाण ती गुणांची ।
खाण ती ज्ञानाची ।। २ ।।

सकारात्मकता असे जिचा स्थायीभाव ।
‘हृदयमंदिरात वसती गुरुदेव (टीप २)’, असा जिचा भाव ।। ३ ।।

शरण आलो तुझिया चरणी माई ।
आम्ही सर्व साधकजन, साधकजन ।।

कृपा असू दे तुझीच सदा ।
आम्ही साधनारत रहाण्या ।। ४ ।।

मार्ग सदा दाखव आम्हा ।
भवसागर तरण्या ।। ५ ।।

सदा कृपेचा हात तुझा राहू दे अमुचे माथा ।
कृतज्ञ आम्ही राहू सदा माई तुझिया चरणा ।। ६ ।।

टीप १ – पू. दीपाली मतकर

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– श्री. दयानंद पांडुरंग खरात, सोलापूर (१४.८.२०२२)