नागपूर येथील राष्ट्रसेविका समितीचा ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रम
नागपूर – विविध आस्थापनांच्या विज्ञापनांमधून महिलांना विक्षिप्त रूपात दाखवले जात आहे. एकप्रकारे हे हिंदु संस्कृतीवरील आक्रमण आहे. स्त्रीचे विज्ञापनांमधून असे रूप दाखवणार्यांना प्रतिसाद न देता त्याला विरोध करायला हवा. यासाठी समाजात महिलांनी सकारात्मक योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीच्या रेशीमबागमधील स्मृती भवन सभागृहातील ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाप्रबंधक प्रतीक्षा तोंडवळकर आणि महानगर प्रमुख करुणा साठे उपस्थित होत्या.
समर्पणभावाने राष्ट्रासाठी कार्य करणार्यांचे सामान्य व्यक्ती ऐकत असते. असे व्यक्तीमत्व घडवणे हे राष्ट्रसेविका समितीचे कार्य आहे. समस्त संघटित हिंदु समाजाची निर्मिती करणे आवश्यक आहे. पवित्रता, धैर्य आणि दृढता अशा गुणांचा हिंदु समाज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. समितीच्या शाखेतून असे संदेश आपण पोचवायला हवेत, असे आवाहनही शांताक्का यांनी केले.