गोवंडी येथील स्वामी समर्थ मठाच्या दानपेटीतील १४ सहस्र रुपयांची चोरी !

मुंबई – गोवंडी येथील स्वामी समर्थांच्या मठाच्या छताचे पत्रे काढून दानपेटीतील १४ सहस्र रुपये चोरट्यांनी चोरून नेले घटना घडली आहे. या प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मठामध्ये २ ऑक्टोबर या दिवशी चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पहाणी केली. चोरट्यांनी पाळत ठेवून हा प्रकार केल्याचा संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील चित्रणाची पडताळणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

चोरट्यांना पोलिसांचे भय न राहिल्याने मंदिरेही आता असुरक्षित झाली आहेत ! अशी अकार्यक्षम यंत्रणा जनतेचे काय रक्षण करणार ?