आपण माहिती-तंत्रज्ञानात, तर पाकिस्तान आतंकवादामध्ये तज्ञ ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

वडोदरा (गुजरात) – भारत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ञ आहे, तर शेजारचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय आतंकवादामध्ये ! हे गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे; पण आम्ही जगाला सांगू इच्छितो, आतंकवाद हा आतंकवाद आहे. आज या हत्याराचा वापर आमच्या विरोधात होत आहे. उद्या तुमच्या विरोधात होईल, अशी चेतावणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात पाकला दिली.