कोलकाता येथील नवरात्रोत्सव मंडपातील श्रीदुर्गादेवीला वेश्येच्या रूपात दाखवले !

कोलकाता (बंगाल) – येथील ‘नवापारा दादाभाई संघ पूजा समिती’च्या नवरोत्रोत्सवाच्या मंडपात श्री दुर्गादेवीला वेश्यव्यवसाय करणार्‍या महिलेच्या रूपात दाखवण्यात आल्याचे वृत्ते ‘ऑपइंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. या मंडपाचे उद्घाटन तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा, सौगत रॉय आणि मदन मित्रा यांनी केले. या मंदिरातील मूर्ती प्रथमच सिलीकॉनपासून (रासायनिक घटकापासून) बनवण्यात आलेल्या आहेत. कोलकातामध्येच यापूर्वी श्रीभूमी दुर्गा पूजा मंडपात ख्रिस्त्यांचे प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या व्हॅटिकन सिटीची रचना केल्याचे समोर आले होते.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची होत असलेल्या अधोगती ! हिंदूंनी यास वैध मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘आमची संकल्पना आणि रचना समाजाला पालटण्यासाठी !’ – संकल्पना आणि रचनाकार संदीप मुखर्जी

श्री दुर्गादेवीला वेश्येच्या रूपात दाखवण्याची संकल्पना आणि रचना करणारे संदीप मुखर्जी यांनी सांगितले की, वेश्या हा एक व्यवसाय आहे. हा सर्वसामान्यांप्रमाणे व्यवसाय नाही आणि तो व्यवसाय ज्या महिला करतात, त्याही याविषयी स्वतःहून सांगत नाहीत. कारण समाज त्यांच्याविषयी एक वेगळा दृष्टीकोन ठेवतो. आपल्याला हा दृष्टीकोन पालटला पाहिजे. आमची संकल्पना आणि रचना समाजाला पालटण्यासाठी आहे. आम्ही वेश्यव्यसवाय करणार्‍यांना समाजात प्रवेश देत नाही. ते त्यांचे काम करत असतांना आपण असा प्रवेश का नाकारतो ? आम्ही मूर्तीमध्ये मातेच्या अशा रूपाला जोडले आहे, जे वेश्याव्यवसायाला दर्शवते.

संपादकीय भूमिका

  • हिंदु समाजाला धर्माविषयी मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांना त्यानुसार कृती करण्यास सांगण्याचा अधिकार शंकराचार्य, धर्माचार्य, संत आदींना आहे. कुणाच्यातरी मनात आले आणि त्याने तसे केले, तर ते अयोग्य आहे !
  • आज समाजात कुणीही उठतो आणि हिंदु धर्मातील शास्त्राच्या विरोधात काहीतरी सांगून त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न करतो, अशांचा आता धर्माचार्यांनी पुढे येऊन प्रतिवाद करणे आवश्यक आहे !