‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातल्यामुळे ‘विदुतलई सिरुथैगळ कत्छी’चे (‘लिबरेशन पँथरर्स पार्टी’चे) खासदार तोल् थिरुमावळवन् यांचा पोटशूळ
चेन्नई – सरकारने आतंकवादावर नियंत्रण आणि सनातन आतंकवादी संघटनांवर बंदी घालण्यात कुठलाही भेदभाव करू नये, अशी मागणी ‘विदुतलई सिरुथैगळ कत्छी’ या राजकीय पक्षाचे नेते तथा खासदार तोल् थिरुमावळवन् यांनी नुकतीच केली. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, भाजप सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तिच्याशी संलग्न संघटना यांच्यावर आतंकवादविरोधी कायद्याखाली बंदी घातली आहे. हाच पुरावा आहे की, आतंकवादावर नियंत्रण ठेवतांनाही भेदभाव केला जातो. चिरकालीन आतंकवादी संघटनांवर बंदी घातल्याविना भारतात आतंकवाद नियंत्रणात आणता येणार नाही, असे थिरुमावळवन् यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, सरकारने दिलेली आतंकवादाची व्याख्या सनातन आतंकवादालाही लागू होऊ शकते. सनातन आतंकवादाने गेल्या ४० वर्षांत भारतात सहस्रावधी लोकांचा बळी घेतला आहे, तसेच कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त केली आहे. (याची नेमकी आकडेवारी खासदार महाशय का देत नाहीत ? – संपादक) भाजप सत्तेत आल्यानंतर सनातन आतंकवादाने प्रेरित झालेल्या हिंसक टोळ्यांनी कोणतीही भीती न बाळगता हिंसाचार करणे, हे नित्याचे झाले आहे. या टोळ्या सत्ताधारी केंद्र सरकारच्या पाठिंब्याने नरसंहार करतांना दिसतात. या सर्वांचे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे.
संपादकीय भूमिका
|