टि्वटरकडून ‘पी.एफ्.आय.’सह त्यांच्या नेत्यांची ट्विटर खाती बंद

नवी देहली – भारतात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय.’) या जिहादी संघटनेसह तिच्याशी संबंधित इतर ८ संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्यानंतर आता टि्वटरनेही ‘पी.एफ्.आय.’च्या अधिकृत खात्यासह काही पदाधिकार्‍यांची टि्वटर खाती बंद केली आहेत. यात ‘पी.एफ्.आय.’चा प्रमुख ओमा सलाम आणि सरचिटणीस अनिस अहमद या दोघांचाही समावेश आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. केंद्रशासनाने ‘पी.एफ्.आय.’ची संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांवरील खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे.

याविषयी टि्वटरने म्हटले आहे, ‘टि्वटर खात्यांविषयी कायदेशीर कारवाईची मागणी झाल्यानंतर भारतासाठी ही कारवाई करण्यात आली.’ त्यामुळे ही सर्व खाती भारतात बंद असणार आहेत.