कवळे, फोंडा, गोवा येथील सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ८८ वर्षे) यांच्यात जाणवलेले पालट !

१. ‘१९.६.२०२२ या दिवसापासून सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्‍या रंगाचा पट्टा आला आहे. ‘तो चैतन्याचा पट्टा आहे’, असे मला वाटते.

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

 

२. सद्गुरु आजींकडे पाहिल्यावर आनंद वाटणे आणि मनातील विचार नष्ट होऊन शांती जाणवणे

सध्या माझे घरी सद्गुरु आजींकडे जाण्याचे प्रमाण पुष्कळ अल्प झाले आहे; परंतु मी जेव्हा त्यांच्याकडे जातो, तेव्हा मला त्यांच्याकडे पाहिल्यावर पुष्कळ आनंद वाटतो आणि माझ्या मनातील विचार नष्ट होऊन आनंद अन् शांती जाणवते.

३. सद्गुरु आजी बोलत असतांना ‘त्यांचे बोलणे ऐकत राहूया’, असे मला वाटते; कारण त्यांच्या बोलण्यामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवते.

४. ‘सद्गुरु आजींच्या डोळ्यांत पुष्कळ तेज आले आहे’, असे मला जाणवते.

५. मला वाटते, ‘त्यांचे डोळे निर्गुणाकडे (शून्याकडे) गेले असून आता त्या निर्गुणाच्या (शून्याच्या) पुष्कळ जवळ गेल्या आहेत. ‘मी आणि ब्रह्म’, अशी त्यांची स्थिती झाली आहे.’

श्री. मनोज कुवेलकर

६. सद्गुरु आजींना कसलीच आसक्ती राहिलेली नसणे

आता त्यांना कसलीच आसक्ती राहिलेली नाही. ‘या आधी मुले आणि साधक यांची आध्यात्मिक प्रगती लवकर व्हायला पाहिजे’, असे सद्गुरु आजींना वाटायचे; परंतु आता त्यांना तेही वाटत नाही. आता त्यांनी सर्व ईश्वर आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्यावर सोडून दिले आहे.

७. ‘तू प.पू. गुरुदेवांचा मुलगा असल्याने घरी विश्रांती घ्यायला न येता आश्रमातच विश्रांती घे’, असे सद्गुरु आजींनी मुलाला सांगणे

यापूर्वी मला कधी पालट हवा असेल, तर मी आश्रमातून घरी जाऊन विश्रांती घ्यायचो. आता सद्गुरु आजींनी मला सांगितले आहे, ‘‘तू प.पू. गुरुदेवांचा मुलगा आहेस. तेव्हा घरी विश्रांती घ्यायला यायचे नाही. आश्रमातच विश्रांती घे आणि अधिकाधिक साधना कर.’’

८. साधक घरी आल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. ‘अडचणींवर मात कशी करू शकतो ?’, याबद्दल त्या साधकांना मार्गदर्शन करतात आणि त्यांना नामजपही सांगतात.

९. सद्गुरु आजींनी आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना नामजप सांगितल्यावर ‘त्यांना त्या नामजपाने पालट जाणवतो’, असे साधक सांगतात.

१०. सद्गुरु आजींना भेटायला आलेल्या साधकांना त्रास होत असल्यास सद्गुरु आजींशी बोलल्यावर साधकांचा त्रास न्यून होतो.

सद्गुरु आजींमधील पालट माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल मी श्री गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. मनोज कुवेलकर (मोठा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), कवळे, फोंडा, गोवा. (२३.६.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक