हिंदु होण्यासाठी धर्म पालटण्याची आवश्यकता नाही ! – संरसंघचालक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

शिलाँग (मेघालय) – हिमालयाच्या दक्षिणेला, हिंदी महासागराच्या उत्तरेला आणि सिंधू नदीच्या काठावरील रहिवाशांना परंपरेने ‘हिंदु’ म्हटले जाते. मोगल आणि ख्रिश्‍चन यांच्या आधीही हिंदू अस्तित्वात होते. खरे तर हिंदु धर्म हा धर्म नसून जीवनपद्धती आहे. हिंदु होण्यासाठी धर्म पालटण्याची आवश्यकता नाही, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना काढले.

ते पुढे म्हणाले,

१. भारताचा सर्वांगीण विकास करणे आणि समाजाचे संघटन करणे, हे संघाचे ध्येय आहे.

२. संघ वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो.

३. ‘हिंदू’ या शब्दात भारतमातेचे पुत्र असलेल्या सर्वांचा समावेश होतो. जे भारतीय पूर्वजांचे  वंशज आहेत आणि जे भारतीय संस्कृतीनुसार जगतात, ते हिंदू आहेत.

४. भारतात रहाणारा प्रत्येक जण हा हिंदु आहे. भारत हा पाश्‍चिमात्य संकल्पनेचा देश नाही.

५. अध्यात्मावर आधारित प्राचीन मूल्यांवरचा विश्‍वास ही देशातील लोकांना एकत्र बांधणारी शक्ती आहे.

६. भारताने जगाला मानवतेचा धडा शिकवला आहे.