जानेवारी २०२१ मध्ये वाराणसी आश्रमात सेवा करणार्या श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात काही कालावधीसाठी वास्तव्यास होत्या. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘रामनाथी आश्रमात पायर्यांवरून ये-जा करतांना आणि पायरीला नमस्कार केल्यावर ‘प्रत्येक पायरी तेजोमय झाली आहे अन् ती सूर्याप्रमाणे चमकत आहे’, असे मला जाणवते.
२. मध्यरात्री जाग आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप ऐकू येऊन मनाला आनंदावस्था प्राप्त होणे :
मी रामनाथी आश्रमात आल्यावर एकदा मध्यरात्री मला जाग आली. तेव्हा मला शांती जाणवली आणि मध्यरात्रीही ती शांती माझ्या मनाला आल्हाददायक वाटली. अशा शांत वातावरणात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मंजुळ स्वरात मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप ऐकू आला. हा नामजप ऐकून माझी झोप नाहीशी होऊन माझ्या मनाला आनंदावस्था प्राप्त झाली.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आश्रमातील प्रत्येक खोलीत सूक्ष्मातून फिरत आहेत’, असे मला जाणवले.
४. गुरुकृपेने ‘सर्वकाही ईश्वराचे आहे’, असे वाटून स्वतःतील अहंकाराची जाणीव होणे
आश्रमातील सर्वकाही अवर्णनीय आहे. ‘मी माझी नाही. माझे काहीच अस्तित्व नाही’, याची मला जाणीव झाली आणि ‘अन्य सगळे व्यर्थ आहे’, असे मला वाटले. ‘सर्वकाही ईश्वराचे आहे. त्याच्याच नियमाने सृष्टी चालते’, असे वाटून आश्रमरूपी गुरुमाऊलींच्या कृपाप्रसादाने माझ्यातील अहंकाराची मला जाणीव झाली.’
– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (१३.२.२०२२)