काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – येथील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा जिहादी आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. त्यांच्याकडून २ ‘एके ४७’ रायफली आणि अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

पुलवामामध्ये बिहारी कामगारांवरील आक्रमणात दोघे घायाळ

पुलवामा येथील रत्नीपोरा भागात २४ सप्टेंबरला जिहादी आतंकवाद्यांनी शमशाद आणि फैजान कासरी या दोघा बिहारी कामगारांवर गोळीबार करून घायाळ केले आहे. यानंतर सुरक्षादलांकडून या भागात शोधमोहीम राबवली जात आहे.

संपादकीय भूमिका

१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले आणि काश्मीरमधील जिहादी विचारसरणी नष्ट केली, तरच तो नष्ट होईल !