चंडीगड विमानतळाला भगतसिंह यांचे नाव देण्यात येणार ! – पंतप्रधान मोदी यांची  घोषणा

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात चंडीगड विमानतळाला भगतसिंह यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली. भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २८ सप्टेंबर या दिवशी त्यांची जयंती साजरी होणार आहे.