मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशात पालट करून वादी आणि प्रतिवादी यांना देण्यात आली आदेशाची प्रत !

सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी करण्याचा आदेश

नवी देहली – मद्रास उच्च न्यायालयात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विपरित आदेशाची प्रत वादी आणि प्रतिवादी यांना देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानेच ‘ही असामान्य घटना आहे’, असे सांगत आश्‍चर्य व्यक्त करत याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. चौकशीचा अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.

उच्च न्यायालयातील या प्रकरणातील एका पक्षाचे अधिवक्ता सुब्रह्मण्यम् यांनी सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दोन्ही प्रती सादर केल्या. यांतील एक उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेली होती, तर दुसरी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली होती. या दोन्ही प्रतींमध्ये मोठा भेद आहे. या आदेशामध्ये एका पक्षाला अण्णानगर बँकमध्ये ११५ कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते; मात्र एका आदेशाच्या प्रतीमध्ये हा उल्लेखच काढून टाकण्यात आला होता.

संपादकीय भूमिका 

न्यायालयातही अशा प्रकारची फसवणूक होत असेल, तर जनतेने आता कुणाकडे पहायचे ?