रायसेन (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती शिक्षकाने हिंदु विद्यार्थिनींच्या वह्यांवर लिहिले ‘मी तुझ्यावर प्रेम करतो !’

  • पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला विचारला जाब !

  • पोलिसांत तक्रार

रायसेन (मध्यप्रदेश) – येथील एका खासगी शाळेत ख्रिस्ती शिक्षकाने अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनींच्या वह्यांवर ‘मला भेट, मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे लिहिल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनींनी शिक्षकाने लिहिलेल्या मजकुराची माहिती पालकांना दिल्यावर पालक शाळेत पोचले आणि त्यांनी शिक्षकावर कारवाई करण्याची व्यवस्थापनाकडे मागणी केली; मात्र व्यवस्थापन याविषयी गप्प होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीसही शाळेत पोचले. पोलिसांनी शिक्षकाला कह्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

संपादकीय भूमिका

असे शिक्षक ‘शिक्षक’पदाला काळीमाच होत ! अशांवर कठोर कारवाई केली, तर अन्यांना त्याचा वचक बसेल !