मेक्सिकोमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १० जण ठार !

मेक्सिको सिटी (मेक्सिको) – २२ सप्टेंबर या दिवशी एका बंदूकधारी व्यक्तीने तारीमोरो शहरातील एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १० लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. मे २०२२ मध्येही अशीच घटना घडली होती. गोळीबाराची गेल्या ४ मासांतील ही पाचवी घटना आहे.

डिसेंबर २००६ मध्ये सरकारने वादग्रस्त सैनिकी अमली पदार्थ विरोधी मोहीम चालू केल्यापासून मेक्सिकोमध्ये ३ लाखांहून हून अधिक हत्या झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.