धर्मनिरपेक्ष देशात हिजाब ‘ऐच्छिक’, तर कट्टरतावादी देशात ‘अनिवार्य’ ! – तस्लिमा नसरीन

नवी देहली – देश ‘धर्मनिरपेक्ष’ असेपर्यंत हिजाब हा ‘ऐच्छिक’ असतो. जेव्हा एखादा देश धार्मिक कट्टरतावादी कह्यात घेतात, तेव्हा हिजाब ‘ऐच्छिक’ नव्हे, तर ‘अनिवार्य’ होतो, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी इराणमध्ये हिजाबविरोधी चालू असलेल्या महिलांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर केले.

संपादकीय भूमिका

भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष देत असतांनाही येथे हिजाब ‘ऐच्छिक’ नाही, तर ‘अनिवार्य’ असल्याचेच दिसून येते !