महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती मुर्मूंसह जगभरातील ५०० जागतिक नेते उपस्थित रहाणार !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर १९ सप्टेंबर या दिवशी राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वेळी जगभरातील ५०० जागतिक नेते उपस्थित रहाणार आहेत.

यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही समावेश आहे. रशिया, बेलारूस, म्यानमार आणि इराण यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही.

संपादकीय भूमिका

‘स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदूंचे प्रमुख शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या अंत्यसंस्काराला भारताच्या राष्ट्रपती उपस्थित नव्हत्या’, हे हिंदूंनी लक्षात ठेवले आहे !