फेसबुकला मोठा फटका !
न्यूयॉर्क – ‘जनरेशन झेड’ म्हणजेच वर्ष १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेले लोक आता सामाजिक माध्यमांवर विशेषतः फेसबुकवर सक्रीय नाहीत. आभासी जगातील मैत्रीवरचा त्यांचा विश्वास उडत चालला आहे, असे ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. दुसरीकडे ‘मिलेनियल्स’ म्हणजेच वर्ष १९८१ ते १९९६ या कालावधीत जन्मलेले २६ ते ४१ वर्षे वयोगटातील लोक अजूनही नियमितपणे फेसबुक वापरत आहेत, असे अमेरिकेत केलेल्या या सर्वेक्षणातून लक्षात आले आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने इंग्लंडमध्ये केलेल्या अन्य एका सर्वेक्षणात किशोरांमध्ये व्हिडिओची आवड वाढल्याचे समोर आले आहे.
१. अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील १३ ते १७ वर्षे वयोगटातील केवळ ३२ टक्के किशोरवयीन मुले नियमितपणे फेसबुक वापरत आहेत. वर्ष २०१४-१५ मध्ये हेच प्रमाण ७१ टक्के होते. त्यावेळी ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘स्नॅपचॅट’ यांसारखी सामाजिक माध्यमे वापरण्याचे प्रमाणही अधिक होते.
२. अमेरिकेतील किशोरवयीन मुलांच्या संख्येत झालेली ही घट अचानक नव्हती. गेल्या ५ वर्षांमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये नियमित फेसबुक वापरण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षी न्यून होत गेले.
३. गेल्या काही वर्षांत सामाजिक माध्यमांवरून माहिती चोरली जात असल्याच्या आणि लोकांची गोपनीयता धोक्यात आल्याचे प्रमाण वाढत असल्याने ‘जनरेशन झेड’मध्ये त्यातील आवड न्यून झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.
४. सामाजिक माध्यमांचा त्यांना पटकन कंटाळा येतो. त्यामुळे सामाजिक माध्यमे युवकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या संकेतस्थळांवर नावीन्यपूर्ण पालट करत आहेत.
भ्रमणभाष वापरणारे ३० टक्के भारतीय मानसिक आजाराने ग्रस्त !युवा पिढीला धर्मशिक्षण आणि साधना न शिकवल्याचे हे फलित ! ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल इन्व्हेस्टिगेशन अँड न्यूरोसायन्स’च्या अहवालानुसार भारतातील ७३ टक्के मुले भ्रमणभाष वापरतात. यांपैकी ३० टक्के मुले ही मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. प्रत्येक १० पैकी ३ मुले नैराश्य, भीती, चिंता आणि चिडचिडेपणा यांनी ग्रस्त आहेत. इंग्लंडमधील ‘नेचर कम्युनिकेशन्स’ने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, सामाजिक माध्यमांचा वापर किशोरवयीन मुलांचे मेंदू, ‘हार्मोन्स’ आणि वर्तन यांवर परिणाम करतात. |