पाकमध्ये हिंदु महिलांवरील अत्याचारांविषयी प्रश्‍न विचारल्यावर अमेरिकेतील पाकच्या राजदूतांचे मौन !

पाकचे राजदूत मसूद खान

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकमध्ये सध्या पूरस्थिती आहे. या काळात शिधा देण्याचे आमीष दाखवून काही धर्मांधांनी एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. अमेरिकेत पत्रकार परिषदेत पाकचे राजदूत मसूद खान यांना अमेरिकेचे माजी सैन्याधिकारी मंगा अनंतमुला यांनी हिंदु मुलीवरील अत्याचाराविषयीचा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच पाकमध्ये अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे धर्मांतर, बलात्कार आणि त्यांच्यावर होणारे अन्य अत्याचारांविषयी जाब विचारला. त्या वेळी त्यांच्या हातात एक फलकही होता. या वेळी मसूद खान अस्वस्थ झाले. त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

एका अहवालानुसार यावर्षी जूनमध्ये पाकिस्तानमध्ये १५७ महिलांचे अपहरण करण्यात आले. यांतील ११२ महिलांचे शारीरिक शोषण, तर ९१ महिलांवर बलात्कार करण्यात आले.

संपादकीय भूमिका

जे सत्य आहे, ते जेव्हा स्वीकारता येत नाही आणि नाकारताही येत नाही, तेव्हा असे मौन बाळगावे लागते, हेच पाकिस्तानने दाखवून दिले आहे. पाकच्या राजदूताच्या मौनातूनच जगाला हे लक्षात आले की, पाकमध्ये काय चालू आहे !