अन्वेषणात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी ३ पोलीस निलंबित

मध्यप्रदेशमध्ये धर्मांधाने हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचे प्रकरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्तरपूर (मध्यप्रदेश) – छत्तरपूर येथे धर्मांध तरुणाने एका १३ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी अन्वेषणात हलगर्जीपणा करणार्‍या ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले. या पोलिसांवर पीडित मुलीवर आरोपीसोबत तडजोड करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. बाबू खान असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अ. २७ ऑगस्ट या दिवशी पीडित मुलगी तिच्या घरातून बेपत्ता झाली. या अपहरणामागे शेजारी रहाणारा बाबू खान असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाली.

आ. २८ ऑगस्टला पीडित मुलीचे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोचले. तेव्हा त्यांना तक्रारीत मुलीचे वय बलपूर्वक १८ वर्षे लिहिण्यासाठी भाग पाडले.

इ. ३० ऑगस्टला मुलगी घरी परतली. बाबू खान याने तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.

ई. बलात्कार पीडितेवर तिचे म्हणणे पालटण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. तरीही पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांनी तडजोड करण्यास नकार दिला. तेव्हा पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. (जनतेचे रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशा घटनांमुळेच पोलिसांची विश्वासाहर्ता अल्प झाली आहे ! – संपादक)

उ. या प्रकरणाची माहिती मिळताच बाल कल्याण समितीने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक !