मुंबई – बॉलीवूडच्या हिंदुविरोधी मानसिकतेमुळे गेल्या काही मासांपासून प्रदर्शित होणार्या चित्रपटांना लोकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. यामुळे अनेक चित्रपट मोठी कमाई करण्यात अपयशी ठरले आहेत. तरीही चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देव-देवतांची खिल्ली उडवण्याचे प्रकार थांबत नाहीत. अभिनेते अजय देवगण यांचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’चा ट्रेलर ९ सप्टेंबर या दिवशी प्रदर्शित झाला. त्यातील एका प्रसंगामध्ये अजय देवगण स्वत:ला ‘चित्रगुप्त’ असल्याचे सांगतात आणि समोरच्या व्यक्तीच्या कर्माच्या हिशेबाच्या गोष्टी करतात. इथपर्यंत प्रकरण ठीक आहे; परंतु ज्या पद्धतीने ते चित्रपटात संवाद बोलतात, ते देवतेची खिल्ली उडवण्यासारखे आहे. इतकेच नाही तर अजय देवगण स्वत: चित्रगुप्त असल्याचे सांगत असतात, त्यावेळी अर्धनग्न मुली त्यांच्या शेजारी उभ्या असतात.
अब अजय देवगन की Thank God निशाने पर, फिल्म के खिलाफ चला बायकॉट ट्रेंड#AjayDevgn #ThankGod #Entertainment https://t.co/K9CcBACN2b
— Hindustan (@Live_Hindustan) September 10, 2022
१. ‘टी-सिरीज’च्या बॅनरखाली इंद्र कुमार, अशोक ठाकरे, आनंद पंडित, मकरंद अधिकारी, सुनील खेत्रपाल इत्यादींनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. आकाश कौशिक आणि मधुर शर्मा यांनी हा चित्रपट लिहिला आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
२. चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दाखवण्यात येणारा काही भाग) प्रदर्शित होताच सामाजिक माध्यमांवर त्याविषयी टीका चालू झाली आहे. चित्रपटात देवी-देवतांची खिल्ली उडवल्याविषयी सामाजिक माध्यमांद्वारे लोकांनी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांचा निषेध केला आहे. या चित्रपटासह बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाबॉलीवूड म्हणजे हिंदूंच्या देवदेवतांचा अवमान करण्याचे एक माध्यम बनले आहे. अशा हिंदुविरोधी चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |