टिपू सुलतानची क्रौर्यता आणि त्याने हिंदूंवर केलेले अत्याचार !

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे दैवत ! कलियुगात असा राजा जन्माला आलाच नाही, अशी हिंदूंची श्रद्धा. असे असूनही आमचे निधर्मी हिंदू टिपू सुलतानला म्हैसूरचा शिवाजी म्हणतात. कुठे टिपू आणि कुठे आमचे शिवछत्रपती ! कुठे सुभेदाराच्या लावण्यवती स्त्रीला आईची उपमा देणारे, तिला साडी-चोळी देऊन तिची आदरपूर्वक पाठवणी करणारे जाणता राजा छत्रपती शिवाजी आणि कुठे शेकडो हिंदू स्त्रियांचे शील भंग करणारा टिपू सैतान ! टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणे म्हणजे महाराजांचा अपमान करणे होय.

क्रूरकर्मा टिपू सुलतान

भरसभेत टिपू सुलतानने सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि मलबारमध्ये १ लाख हिंदूंना बाटवणे

हैदर अली हा म्हैसूरच्या हिंदु राजाच्या सैन्यातील अधिकारी होता; परंतु त्याने त्या हिंदु राजाचा घात करून राजसत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याच्यासारखाच पराक्रमी आणि क्रूर पुत्र टिपू याच्या हाती म्हैसूरचे हिंदू संस्थान आले. सत्ता हाती येताच टिपूने ‘सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करीन’, अशी प्रतिज्ञा भर सभेत घेतली. त्याने गावोगावच्या मुसलमानांना लेखी कळवले, ‘‘झाडून सार्‍या हिंदू स्त्री-पुरुषांना इस्लामची दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने इस्लाम स्वीकारणार नाहीत, त्यांना बलात्काराने मुसलमान करा किंवा हिंदू पुरुषांना ठार मारा आणि स्त्रियांना मुसलमान बांधवांमध्ये वाटा.’’ पुढे टिपूने मलबारमध्ये १ लाख हिंदूंना बाटवले.

टिपूने कर्नाटकमधील मराठ्यांच्या राज्यावर आक्रमण केल्यावर तेथील हिंदूंनी नद्या आणि आगीत उड्या मारून बलीदान पत्करणे

कर्नाटकमधील मराठ्यांच्या राज्यावर टिपूने स्वारी केली. तेथील हिंदू स्त्री-पुरुषांना टिपूच्या अत्याचारी आक्रमणास तोंड देणे अशक्य होते. त्यामुळे मुसलमान सैन्याच्या तावडीत सापडण्याच्या आधीच त्यांनी स्वतःच्या लहान मुलांसह कृष्णा, तुंगभद्रे यांसारख्या नद्यांमधून उड्या मारून जीव दिला. काही जण तर आगीत उड्या टाकून भस्मसात् झाले; पण बाटून मुसलमान झाले नाहीत. केवढा हा स्वधर्माचा अभिमान ?

हिंदूंच्या नायनाटासाठी टिपूने कडव्या मुसलमानांचे सैन्य उभारणे आणि त्याने पराक्रम करणार्‍या सैनिकांमध्ये हिंदू स्त्रियांना वाटणे, तसेच टिपूला देश-विदेशांतील मुसलमानांकडून विविध पदव्या मिळणे

एके दिवशी तर टिपूने २४ घंट्यांच्या आत ५० सहस्र हिंदू बाटवले. ‘कुठल्याही मुसलमान सुलतानाला हे महाकृत्य करवले नसेल; पण अल्लाच्या कृपेने इस्लामच्या प्रचाराचे आणि काफिरांच्या नाशाचे हे महाकृत्य मी केले, याचा मला अभिमान वाटतो’, असे टिपू म्हणत. हिंदूंच्या नायनाटासाठी काही कडव्या मुसलमानांची खास टोळी टिपूने उभारली. त्या टोळीला तो ‘आपल्या मुलांचे सैन्य’, असे लाडाने संबोधत असे. हिंदू स्त्रियांना बलात्काराने बाटवण्यात, हिंदूंची लुटालूट करण्यात, त्यांचे घरे जाळून टाकण्यात, त्यांना कापून काढण्यात, टिपूच्या ‘लाडक्या सैन्यातील’ जे मुसलमान सैनिक विशेष पराक्रम करतील, त्या प्रत्येकांना तो पारितोषिक म्हणून हिंदू स्त्रियांतील तरुण नि सुंदर मुली म्हणजेच आपल्या हिंदूंच्या आया-बहिणींना निवडून त्यांच्यात वाटून द्यायचा. टिपू सुलतानच्या या इस्लामी प्रचारामुळे सारे इस्लामी जग भारावून गेले होते. त्याला ‘सुलतान’, ‘गाझी इस्लामचा कर्मवीर’, अशा पदव्या देश-विदेशांतील मुसलमानांकडून आणि थेट तुर्कस्तानच्या खलिफाकडून मिळाल्या.

टिपू सुलतानने भावे संस्थानिकांना बेड्या ठोकणे आणि राजस्त्रियांतील सुंदर स्त्रियांवर सर्वांसमक्ष बलात्कार करण्यात येणे

टिपूला ब्राह्मणांचा अधिक राग होता; कारण ब्राह्मण वर्ग हिंदू समाजात स्वत्वाचा आणि हिंदुत्वाचा ज्वलंत अभिमान संचारण्याचे कार्य करत असत. अशाच एका भावे नावाच्या ब्राह्मण संस्थानिक असलेल्या नगरगुंदवर टिपूने चाल केली. टिपूच्या सैन्यासमोर भावे संस्थानिकांचे सैन्य टिकू शकले नाही. टिपूने भावे आणि त्यांचे सहकारी पेठे यांना बेड्या ठोकल्या. सर्व राजस्त्रियांची टिपूने विटंबना केली. त्या राजस्त्रियांतील ज्या सुंदर स्त्रिया होत्या, त्यांचा विकृतपणे छळ करण्यात आला आणि सगळ्यांदेखत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामध्ये जी अतिसुंदर स्त्री होती, तिला एैय्याशीसाठी टिपूने स्वतःच्या जनानखान्यात डांबले. आपल्या डोळ्यांदेखत सुना-लेकींची चाललेली ही अमानुष विटंबना पाहून पेठे यांच्या वृद्ध मातेने दुःखद होऊन प्राण त्यागले.

टिपू हा सुलतान नव्हे, तर सैतान !

इतका अत्याचार करूनही हिंदुस्थानी इतिहासात टिपूला डोक्यावर बसवण्याइतके त्याने आमच्यासाठी काय केले आहे ? त्यामुळे यापुढे टिपू सुलतान आणि त्याच्यासारख्या अत्याचारींचा उदोउदो होऊ देऊ नका. टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देऊ नका; कारण त्यांचे स्थान हिंदूंसाठी उच्च आहे आणि टिपू सुलतान नव्हता, तर तो सैतान होता.

– लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

(प्रमुख संदर्भ : वि.दा. सावरकर लिखित ‘भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’)