पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरु पदावर विराजमान होण्यापूर्वी मिळालेल्या पूर्वसूचना

सौ. निवेदिता जोशी

अ. ‘२९.६.२०२२ या दिवशी सकाळी उठल्यापासून ‘आज आपल्याला काहीतरी शुभ वार्ता मिळणार आहे’, असे मला वाटले.

आ. त्या दिवशी माझे मन उत्साही आणि आनंदी होते.

इ. भावसोहळ्याच्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ वाराणसी आश्रमाची वैशिष्ट्ये वर्णन करत असतांना ‘ते सद्गुरु पदावर विराजमान होतील’, असे वाटणे आणि प्रत्यक्षात तसे घडणे : त्या दिवशी मला एका भाव सोहळ्याला जाण्याचा निरोप मिळाला. तेथे पडद्यावर (प्रोजेक्टरवर) दाखवण्यात आलेले श्रीकृष्णाचे चित्र पाहून मी भावप्रयोग करत असतांना माझी भावजागृती झाली आणि ‘मला श्रीकृष्णाशी एकरूप व्हायचे आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मला पू. नीलेश सिंगबाळ वाराणसी आश्रमाची गुणवैशिष्ट्ये दाखवत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांच्याकडे पाहून ‘आता हे ‘सद्गुरु’पदावर विराजमान होतील’, असा माझ्या मनात ५ – ६ वेळा विचार आला. थोड्याच वेळात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरु पदावर विराजमान झाले आहेत’, ही आनंदवार्ता दिली.

त्या वेळी ‘तो भावसोहळा उच्च लोकात चालू असून गुरुकृपेने मला तो पहाण्याचे आणि अनुभवण्याचे भाग्य लाभले’, असे मला वाटले. गुरुदेवांनी हे सर्व अनुभवायला दिले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. निवेदिता जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक