देहलीत सरकारी जमिनीवर अवैध मदरसा !

नवी देहली – भारतातील उत्तरप्रदेश आणि आसाम या २ राज्यांमध्ये अवैध मदरशांवर बुलडोझर चालत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत; मात्र देशाची राजधानी देहलीत याच्या विरुद्ध घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. देहलीत सरकारी जमिनीवर अवैध मदरसा उभारण्यात आला आहे. हा अवैध मदरसा देहलीतील निजामुद्दीन भागात आहे. ‘मदरसा जामिया अरेबिया’ या नावाने हा मदरसा ओळखला जातो.  याविषयीचे वृत्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना मदरशाचे संचालक आणि त्याचे साथीदार यांनी ओलीस ठेवल्याचे वृत्त आहे.

संपादकीय भूमिका 

अवैध मदरसा बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?