एका विशेष धर्मियांना खुश करण्यासाठी माझ्या पतीला अटक !

आमदार टी. राजा सिंह यांच्या पत्नीचा आरोप करत उच्च न्यायालयात त्वरित सुनावणीसाठी याचिका प्रविष्ट !

आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील आमदार टी. राजासिंह यांना महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून ‘प्रिव्हेंटिव डिटेंशन अ‍ॅक्ट’ कायद्याद्वारे अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोपांवर त्वरित सुनावणी करण्यात यावी, यासाठी त्यांच्या पत्नीने राज्याच्या उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. राजा सिंह यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, माझ्या पतींना केवळ एका विशेष धर्मियांना खुश करण्यासाठी कारागृहात ठेवले आहे. विशेष धर्मियांच्या लांगूलचालनासाठी हे करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणतेही कारण नाही.