हरितालिका व्रत

आज (३० ऑगस्ट २०२२ या दिवशी) ‘हरितालिका तृतीया’ आहे. त्या निमित्ताने…

हरितालिका

१. तिथी : भाद्रपद शुक्ल तृतीया

२. इतिहास आणि उद्देश : पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

३. व्रत करण्याची पद्धत : प्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)